'आयटी' कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना खराखुरा मदतीचा हात

आयटी क्षेत्रातील मंडळी म्हटली की भरपूर पैसा कमवणारा नोकरदारवर्ग... त्यातही सामाजिक बांधिलकी, शेतकरी या विषयापासून तर कोसो दूर असंच समजलं जातं… पण पुण्यातल्या 'आयटी'मधल्या काही जणांनी या समजाला छेद दिलाय. 

Updated: Jan 24, 2015, 11:07 PM IST
'आयटी' कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना खराखुरा मदतीचा हात title=

पुणे : आयटी क्षेत्रातील मंडळी म्हटली की भरपूर पैसा कमवणारा नोकरदारवर्ग... त्यातही सामाजिक बांधिलकी, शेतकरी या विषयापासून तर कोसो दूर असंच समजलं जातं… पण पुण्यातल्या 'आयटी'मधल्या काही जणांनी या समजाला छेद दिलाय. 

शेतकरी आत्महत्या या विषयावर या मंडळींचं मन हळवंही होतंय आणि ते त्यासाठी काम ही करताना दिसत आहेत…शेतामध्ये जमलेली लोकं पाहिल्यावर तुम्हाला तसं काही विशेष वाटणार नाही… पण हे लोक असेच गप्पा मारायला जमलेले नसतात…

पुण्यामध्ये नामवंत आयटी कंपनीत काम करणारे मिलिंद काळे आणि त्यांचे काही सहकारी शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये शेती कशी करायची आणि उत्पन्न कसं वाढवायचं याचा कानमंत्र देतायत. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, त्याचं कर्जबाजारीपण या सर्व गोष्टींचा परिणाम मिलिंद काळे यांच्यावर झाला. 

त्याचमुळे काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतीचा, सेंद्रिय खतांचा आणि कमी खर्चात शेती करण्याचा अभ्यास केला आणि आता ते राज्यभरात वेळ मिळेल तसं शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न वाढवणारी शेती कशी करायची याची माहिती देतायत. मिलिंद काळे, दीपक श्रोते आणि त्यांचे १० सहकारी विविध भागात जाऊन शेतकऱ्यांना सल्ला देण्याचं काम करतायत.  

दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झालाय. अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातील आयटीतज्ज्ञांनी आपल्या परीनं मदतीचा खारीचा वाटा उचललाय, हेही नसे थोडके...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.