आता, 'लर्निंग'ही होतंय 'लिक'...

आजच्या घडीला स्मार्ट फोननं सगळ्यांचंच जीवन व्यापून टाकलंय. याच स्मार्ट फोनचा उपयोग महागड्या प्रवेश परीक्षा देण्यासाठी झाला तर... हो हे शक्य आहे.

Updated: May 8, 2015, 09:21 PM IST
आता, 'लर्निंग'ही होतंय 'लिक'... title=

शिर्डी : आजच्या घडीला स्मार्ट फोननं सगळ्यांचंच जीवन व्यापून टाकलंय. याच स्मार्ट फोनचा उपयोग महागड्या प्रवेश परीक्षा देण्यासाठी झाला तर... हो हे शक्य आहे.

'लर्निंग लिक्स' अॅपमुळे प्रवेश परीक्षेसाठी लागणारी भरमसाठ फी न भरताही अभ्यास करणं शक्य होणार आहे... आणि हे अॅप शोधलंय शिर्डीतल्या संदीप चव्हाण यांनी...

तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर हे 'लर्निंग लिक्स' अॅप विकसित करण्यात आलंय. मोबाईलसाठी गुगल प्ले स्टोअरमधून, तर कॉम्प्युटरसाठी ब्ल्यू स्टॅकचा वापर करून हे अॅप डाऊनलोड करता येईल.

प्रत्येक विषयासाठी ४०० ते ५०० रुपयाप्रमाणे चार विषयांसाठी हे अॅपलिकेशन अवघ्या १२०० ते १३०० रुपयांत डाऊनलोड करता येईल. या अॅप्लिकेशनचा विद्यार्थ्यांना फायदाही होतोय. 

या अॅपमध्ये भौतिक, जीव, रसायनशास्त्रासह गणिताचे दहा हजारांपेक्षा जास्त प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे, चूक की बरोबर याचा रिझल्टही लगेच देण्याची यंत्रणाही आहे. टाइम लिमिटचं घड्याळही देण्यात आलंय.  मागील प्रश्नपत्रिकेपेक्षा पुढची प्रश्नपत्रिका किती वेळात सोडवली हेही समजतं. त्यामुळे लर्निंग लिक्स या अॅपलिकेशनचा निश्चितच गरजू विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होईल यात शंका नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.