औरंगाबाद : ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा येथील घरात काही अज्ञात व्यक्तींनी घुसून नासधूस केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अज्ञात व्यक्तींनी घरातील सामानाची तसेच महानोर यांना मिळालेल्या पुरस्कारांची तसेच सन्मानपत्रांची नासधूस केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी अज्ञात व्यक्तींनी धमक्याही दिल्याचे महानोर यांनी सांगितले.
या भ्याड हल्ल्याची तक्रार करणार नसल्याची भूमिका महानोर यांनी घेतली आहे. पोलिसांवर विश्वास नसल्याने आपण अशी भूमिका घेत असल्याचे स्पष्टीकरण महानोर यांनी दिले. कॉ़म्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कवी ना. धो. महानोर यांना धमक्यांचे फोन आले होते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी महानोर यांनी तक्रार केली तर कारवाई करण्याचे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.