ठाणे : चलनातील रद्द झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या एकूण ९६ लाख ९० हजार ५०० रुपयेच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ठाणे सोनसाखळी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा यांनी खारेगाव रेतीबंदर रोड या ठिकाणावरून सापळा रचून या नोटा जप्त केल्या. एका आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.