मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर चार वाहनांचा विचित्र अपघात, तीन ठार

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खोपोली येथे विचित्र अपघात झाला. दोन ट्रेलर, एक टेम्पो  आणि एक इको कारमध्ये झालेल्या अपघात तीन जण ठार झालेत.   

Updated: Dec 27, 2016, 11:10 AM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर चार वाहनांचा विचित्र अपघात, तीन ठार title=

खोपोली : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खोपोली येथे विचित्र अपघात झाला. दोन ट्रेलर, एक टेम्पो  आणि एक इको कारमध्ये झालेल्या अपघात तीन जण ठार झालेत.  ट्रेलरचा ब्रेक फेल टेम्पोला धडक बसल्याने हा अपघात  सकाळी ८ वाजण्याचा सुमारास झाला. दरम्यान,  मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती.

या अपघातात सुमारे ८ ते १० जण जखमी असून यातील दोघे गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. पुण्याहून मुंबईकडे चाललेला ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने खोपोली फूड प्लाजाजवळ उलटला. अपघातामुळे मुंबईला जाणारी एक लेन बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होती. अपघातामुळे सुमारे ३ ते ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दरम्यान, या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. आयआरबीचे देवदूत यंत्रणा, पोलीस आणि शिववाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मदत करीत जखमींना बाहर काढले.