ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा

नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे. 

Updated: Dec 22, 2016, 07:43 PM IST
ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा title=

मुंबई : नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे.

विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान रात्री 10.30 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे पण या तीन दिवशी ही वेळ वाढवून पहाटे 1 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

FLW2 हा परवाना असलेली मद्याची दुकानं ही नमूद दिवसांत पहाटे 1 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. तसचं नमूद दिवशी ई परवाना असलेले बीअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहतील.