रत्नागिरी : आजोबा आणि नातीच्या नात्यांला काळिमा फासणार प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. गुहागर तालुक्यातील भातगाव तिसंगी गावात आजोबाने आपल्या नातीचे लैंगिक शोषण केल्याचा हा घृणास्पद प्रकार घडला आहे.
भातगाव तिसंगी गावातील एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपल्याच १४ वर्षांच्या नातीवर अतिप्रसंग केला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आजोबा विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
यावर कारवाई करत गुहागर पोलिसांनी आरोपी रमेश कदम याला अटक केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.