जालना : दिंड्या पताका घेऊन विठ्ठल-विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वाटेवर असलेली संत मुक्ताबाईची पालखी आंबड शहरात दाखल झालीय.
आंबडवासीयांकडून पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शहरातील मस्योदरी देवीच्या मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे.
300 वर्षापेक्षा जास्त काळाची परंपरा असलेली संत मुक्ताबाईची पालखी दरवर्षी पंढरपूरच्या सोहळ्यात सहभागी होत असते. पंढरपूरच्या वारीसाठी निघालेली आणि तिथे दाखल होणारी पहिली दिंडी म्हणून मुक्ताईच्या पालखीलाही विशेष मानाचं स्थान आहे.
21 जून रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली ही पालखी तब्बल ६०० किलोमीटर चा पायी प्रवास करून 23 तारखेला पंढरपूरला पोहचणार आहे. यंदा या दिंडीत एक हजारा पेक्षा जास्त वारकरी सहभागी झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.