गृहराज्यमंत्र्यांनी केलं बिअर-बारचं उद्घाटन, ते रेस्टॉरंट, राम शिंदेंचं स्पष्टीकरण

शनिवारी रात्री नगर-पुणे रस्त्यावरील एका बारचं उद्घाटन झालं, पण हा उद्घाटन सोहळा चर्चेत आला आहे. कारण या बारचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केलं.  

Updated: May 11, 2015, 03:51 PM IST
गृहराज्यमंत्र्यांनी केलं बिअर-बारचं उद्घाटन, ते रेस्टॉरंट, राम शिंदेंचं स्पष्टीकरण title=

अहमदनगर : शनिवारी रात्री नगर-पुणे रस्त्यावरील एका बारचं उद्घाटन झालं, पण हा उद्घाटन सोहळा चर्चेत आला आहे. कारण या बारचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केलं.  

या उद्घाटन सोहळ्यात राम शिंदे यांच्या सोबत राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार सुधीर तांबे, यांच्यासह नगर जिल्हय़ातील अनेक मान्यवर उपस्थित होते. एकीकडे राज्यात दारूबंदीची चळवळ जोरात सुरू असतांना गृहराज्यमंत्र्यांनी बारचं उद्घाटन करणं अशोभनीय आहे. 

दरम्यान, यावर उत्तर देत गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं, बारचं नाही असं ते म्हणाले. आधी तिथं बार होता पण तो आता बंद झालंय. त्याजागी फॅमिली रेस्टॉरंट सुरू झालंय, असं स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिलं. 

दरम्यान, या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहराज्यमंत्री राम शिंदेवर काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.