एकतर्फी प्रेमातून तरुणानं केली 'त्या' नवविवाहितेची हत्या

ठाण्यात दिवसाढवळ्या प्रियांका प्रमोद खराडे या नवविवाहितेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीसांनी दिपेश दोधडे या तरुणाला अटक केलीय. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचं समोर आलंय. 

Updated: May 11, 2015, 10:37 AM IST
एकतर्फी प्रेमातून तरुणानं केली 'त्या' नवविवाहितेची हत्या title=

ठाणे: ठाण्यात दिवसाढवळ्या प्रियांका प्रमोद खराडे या नवविवाहितेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीसांनी दिपेश दोधडे या तरुणाला अटक केलीय. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचं समोर आलंय. 

चार दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास पासपोर्ट कार्यालयामागील रस्त्यावर ही घटना घडली होती. घटनेच्या आधी आठच दिवसांपूर्वी तिचं कल्याणमधल्या खराडे याच्याशी लग्न झालं होतं. ठाण्यात किसननगर इथं तिच्या माहेरी आली होती. 

प्रेमप्रकरणाच्या वादातून हा प्रकार झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यादृष्टीनं तपास करुन दिपेश दोधडे या तरुणाला अटक झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.