राज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख

 सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

Updated: Oct 17, 2015, 10:36 AM IST

 

कल्याण :  सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

परदेशातून येऊन एका महिलेने भारतावर १० वर्ष राज्य केले. सोनिया गांधी... पण ज्या व्यक्तीला आपण निवडून दिले. तो जातो परदेशी... पाहा काय सुरू आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मोदींवर तोफ डागली. 

एका महिलेला तिचा पती म्हणतो, मी तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणणार, बंगला तयार करणार, तू काय मागशील ते आणूण देणार... त्यावर ती म्हणते चल मोदी कुठला... अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदी यांची खिल्ली उडविली. 

भाजप सेना पगारासाठी एकत्र, नंतर वेगळे....
भाजप-सेना पगाराच्या तारखेच्यावेळी एकत्र येतात, मग वेगळे होतात. एखादं टेंडर आलं, पैसे खायचे असतील तेव्हा दोन्ही एकत्र मग दोघ वेगळे होतात... या दोघांनी कल्याण-डोंबिवलीची वाट लावली आहे. 

थापाला समानअर्थी शब्द भाजपा

थापा मारणे याला समानअर्थी शब्द भाजपा झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पॅकेज कसले वाटता. कल्याण - डोंबिवलीसाठी पॅकेज जाहीर करताना भाजपाकडे पैसे आलेत कुठून? उमेदवार सापडत नाही म्हणून दुसऱ्या पक्षांकडे बघतात, नशीब ओबामांकडे उमेदवार मागितले नाहीत.

ठाण मांडून बसणार... 

 मी निवडणुकीत येथे ठाण मांडून बसणार आहे. तुमची भेट होतच राहील. तुम्ही आतापासून प्रचाराला लागा. २२ तारखेला पुन्हा भेटू. आता जास्त काही बोलत नाही.



मोदींना विचारा अच्छे दिन कुठे गेले ?

- मोदींना विचारा आता अच्छे दिन गेले कुठे? त्यांची ती जाहिरातबाजी आता कुठे आहे. त्यांनाच विचारा  कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा. दुष्काळ जाहीर करायचा सोडून टॅक्सवर भर देतात, हे यांचे काम. आता पॅकेज जाहीर करतात. मतांच्या राजकारणासाठी वाटेल ते करतील.



मनसेने जात पात पाहिली नाही

जे विकले जाणार आहेत त्यांनी आधी नोटा तपासून घ्या. यांना उमेदवार मिळत नाहीत. कोण येतोय याचीच वाट पाहतात. हे यांचे उद्योग. मनसेमध्ये कधी जातपात बघितली जाणार नाही, महाराष्ट्र व मराठीसाठी झटताय हे महत्त्वाचे.

राष्ट्रवादी संपली, आता काय बोलणार

- राष्ट्रवादीबद्दल काय बोलणार. ते आधीच संपलेत. मात्र, शरद पवारांना ब्राह्मण मुख्यमंत्री नको होते तर त्यांनी मोदींना सांगायला पाहिजे होते, असा टोला पवारांना राज ठाकरे यांनी हाणला.

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

  • या सभेत सगळं बोलणार नाही - राज ठाकरे 

  • बघायला आलोय तुमचा उत्साह - राज ठाकरे 

  • पॅकेज वाटताहेत, काय साखरपुडा आहे - राज ठाकरे 

  • साडे सहाहजार कोटी रुपये देतात, निवडणुकीच्या तोंडावर का पाकिटं वाटताहेत - राज ठाकरे 

  • थापा मारणे, याला डिक्शनरीत शब्द आला आहे, भाजपा - राज ठाकरे

  • कोणीही म्हणतं का 'भाजपा' मारू नको - राज ठाकरे 

  • यांना उमेदवार मिळत नाही विधानसभेच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेमधून आयात केले - राज ठाकरे 

  • ओबामांना उमेदवारांबाबत विचारलं नाही, हे नशीब - राज ठाकरे 

  • सरकार बदलून फरक का पडला आहे - राज ठाकरे 

  • पगाराच्या दिवशी भाजप-शिवसेना एकत्र येतात, टेंडरच्या वेळी एकत्र येतात - राज ठाकरे 

  • मुख्यमंत्री हा बसवलेला माणूस, राज्य चालवायला बसलेला माणूस लागतो - राज ठाकरे 

  • परदेशी महिला भारतात येऊन राज्य केलं. आणि इथल माणूस परदेशात जातो - राज ठाकरे

  • अच्छे दिवस कुठे आले, १०० दिवस झाले - राज ठाकरे 

  • मोदींची उडवली खिल्ली. 

  • नाशिक महानगरपालिकेसाठी अॅप दिलं, आता बिलं भरायला लोकांना महापालिकेत जावे लागत नाही - राज ठाकरे 

  • पुतळे काय बांधताहेत जिवंत माणसांचा विचार करा - राज ठाकरे 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.