समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणीची मागणी कोर्टाने फेटाळली

समीर गायकवाडला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ब्रेन मॅपिंग चाचणीची मागणी फेटाळून लावली. पोलिसांनी कोर्टाकडे अर्ज केला होता.

Updated: Oct 9, 2015, 04:53 PM IST
समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणीची मागणी कोर्टाने फेटाळली title=

कोल्हापूर : समीर गायकवाडला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ब्रेन मॅपिंग चाचणीची मागणी फेटाळून लावली. पोलिसांनी कोर्टाकडे अर्ज केला होता.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाड यानं मानसिक स्थितीचं कारण पुढं करत ब्रेन मॅपिंग चाचणी करू देण्यास नकार दिलाय. एवढंच नव्हे तर मानसिक स्थिती चांगली झाल्यानंतरही समीरनं ब्रेन मॅपिंगला नकार दिलाय. समीरची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सरकारी पक्षानं न्यायालयाकडे केली होती.

अधिक वाचा : पानसरे हत्या प्रकरण : आरोपी गायकवाड 'सनातन'चा पूर्णवेळ कार्यकर्ता

न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे, समीर गायकवाडला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं २३ ऑक्टोबरपर्यंत समीरला न्यायालयीन कोठडी दिली आहे.  रम्यान समीरच्या ओळख परेड मध्ये १४ वर्षांच्या मुलानं समीरला ओळखलं होतं. त्यामूळे समीरची अधिक चौकशी करण्यासाठी पुन्हा कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी पक्षानं न्यायालयाकडे केली होती. 

अधिक वाचा : गृहराज्यमंत्र्यांनी केली पानसरेंच्या खुन्याची पाठराखण...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.