नाशिक : आपल्या एककुलती एक असा सत्ताकेंद्रास्थळी म्हणजेच नाशिकमध्ये आज राज ठाकरेंची प्रचारसभा आहे. नाशिकच्या सभेतील गर्दीच विजयाची खात्री देत आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी नाशिककरांना साद घातलीय.
पुण्याप्रमाणेच आपण सत्तेत असताना नाशिक महापालिकेत काय काय कामं केली हे दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी डिजीटल प्रेझेंटेशनची मदत घेतलीय.
- जे गेले ते आपल्यासाठी मेले... बंडोबांना राज ठाकरेंचं उत्तर
- थापा या शब्दाला पर्यायी शब्द आला आहे भाजपा - राज ठाकरे
- मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'भाजपकुमार थापाडे'
- २०१४ च्या निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधान म्हणाले होते प्रत्येक नागरिकाच्या खात्यात मी १५ लाख टाकणार
- महाराजांचं स्मारक बांधायला यांच्याकडे पैसे आहेतच कुठे? मुळात स्मारकं उभीच का करतात?
- स्मारकं उभी करायचीच असतील तर गडकिल्ल्यांचं संवर्धन करा - राज ठाकरे
- थापेबाज मुख्यमंत्री उद्या नाशिकमध्ये येऊन थापा मारतील... मेट्रो, मोनो, विमानतळं अशी वाट्टेल ती आश्वासनं देतील...
- नाशिकची व्हायरल झालेली विकास नियमावली असं सांगते की ९ मीटरच्या खालील रस्त्यांवरील घरांना वाढीव एफएसआय मिळणार नाही... म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त नाशिक निर्वासित होणार - राज
- सेना भाजपने नाशिकमध्ये ८८ गंभीर गुन्हे असलेले उमेदवार उभे केलेत - राज ठाकरे
- जे राष्ट्रवादी करत होती तेच भाजप करत आहे. भाजपला सत्तेचा माज आलाय
- मनपावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही... भ्रष्टाचार रोखला म्हणून अनेक जण गेले - राज ठाकरे
- 25 वर्ष असलेल्यांना जमलं नाही... पाच वर्षांत काय केलं ते मांडतो - राज ठाकरे
- कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी महापौरांचा सत्कार अमेरिकेत झाला... मुख्यमंत्र्यांचा नाही झाला - राज ठाकरे
- कारण कुंभमेळ्याचं काम महापालिकेने केले आणि भाजप श्रेय घेऊ पाहतंय - राज ठाकरे
- नाशिकमध्ये आम्ही 510 किलोमीटरचे रस्ते बांधले... 'शहर विकास' माझी पॅशन आहे राजकारण नाही - राज ठाकरे
- उज्जैन कुंभमेळ्याला 2200 कोटी आणि नाशिकच्या कुंभमेळ्याला 1100 कोटी... हा दुजाभाव का? - राज ठाकरे
- नाशिकमधला 25 वर्षं जुना अनधिकृत भंगारबाजार दोन दिवसात बुलडोझरने साफ करून टाकला - राज ठाकरे
- नाशिकमध्ये मुकणे धरणातल्या 16 किलोमीटरच्या पाईपलाईनमुळे शहराचा पुढच्या 40 वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटेल - राज ठाकरे
- 20 लाख लिटर्सच्या 17 पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या
- पाच एकरमध्ये महिंद्रा समुहाच्या सीएसआर निधीतून चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क साकारलं - राज ठाकरे
- जीव्हीके कंपनीच्या सीएसआरमधून बाळासाहेबांचं स्मारक उभं केलं - राज ठाकरे
- मुकेश अंबानींनी दिलेल्या सीएसआर फंडातून गोदा पार्कचं काम... येत्या काही दिवसांत काम पूर्ण होईल - राज ठाकरे
- निवडणुकासाठी पैसे लागतात...पण लोकांना ओरबाडून नाही - राज ठाकरे
- नाशिकमध्ये पाच वर्षांत तीन आयुक्त येऊन गेले... कुणालाही विचारा... मी कुणालाही कोणत्याही टेंडर करता किंवा वैयक्तिक कामांकरता एकही फोन केला नाही - राज ठाकरे
- भ्रष्टाचारी आणि गुंडांच्या हातात तुम्हाला तुमचं शहर द्यायचं असेल तर राज ठाकरे काही करू शकणार नाही, नाहीतर हे शहर तुमचं तुम्हाला लखलाभ
- शहराचे भविष्य घडवायचे असेल तर मनसेशिवाय पर्याय नाही... नाशिककरांनी निर्णय घ्यायचा आहे
- नाशिकचा विकास व्हावा असं वाटत असेल तर पुन्हा एकदा सत्ता मनसेच्या हातात द्यावीच लागेल - राज ठाकरे