मुंबई : केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात अचानक पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सून सक्रीय होत असल्याची ही चिन्हं असल्याचं सांगण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
नागपुरातही काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाल्याचं सांगण्यात येत आहे. केरळात मान्सूनने एक दिवस उशीरा का असेना धडक दिली आहे. हवामान अनुकूल असल्यास तीन दिवसात मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.