गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस

गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात काल वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. यामुळे लोकांना उन्हापासून जरी थोडा दिलासा मिळाला असला तरी वादळी वा-यांनी अनेक घरांचं नुकसान केलंय. 

Updated: May 19, 2016, 07:43 AM IST
गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस title=

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात काल वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. यामुळे लोकांना उन्हापासून जरी थोडा दिलासा मिळाला असला तरी वादळी वा-यांनी अनेक घरांचं नुकसान केलंय. 

ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळून पडली. आलापल्ली येथील टेकडी कॉलनी आणि वन वसाहतमधील क़्वार्टरवरील पत्र्याची टीनेसुद्धा या वादळामुळे उडाली आहेत. यामुळे वनकर्मचारी कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

वादळामुळे आलापल्लीसहित पाच तालुक्यातील वीज खंडित झाली आहे. या वादळी पावसामुळे लाखोंचे नुकसान झालेय.