नाशिक : केबीसी घोटाळा प्रकरणी आणखी १ कोटी ४८ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आलेय. आधी पाच लॉकर उघडल्यानंतर जवळपास १८ किलो सोने सापडले होते.
नाशिकमधील केबीसी घोटाळा प्रकरणी आरोपींबाबत आणखी नवीन माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाणकडून आणखी १ कोटी ४८ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आलंय. कर्जासाठी हे सोनं तारण ठेवले होते.
अफरातफरीच्या पैशांतूनच या सोन्याची खरेदी करण्यात आली होती. आजच्या ५ किलोसह आतापर्य़ंत सुमारे १८ किलो ९०० ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केलंय. केबीसी घोटाळ्यात राज्यातील शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे.