ठाणे : मध्य रेल्वेला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या २५ ते ३० मिनिटांने धावत आहेत.
कळवा ते ठाणे स्टेशन दरम्यान एक लोकल अचानक बंद पडली. त्यामुळे कल्याणहून मुंबई सीएसटीकडे येणारी धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस ही घटना घडल्याने ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली.
या बंद पडलेल्या लोकलमुळे अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर, या लोकल बिघाडामुळं मध्य रेल्वेची डाऊन धीम्या तसेच जलद मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरू आहे.