'गरज असल्यास खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणा पण...'

खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. संसदेत देखील हा विषय आला होता. गरज असल्यास जरुर असे नियंत्रण आणावे. मात्र, त्यामुळे या शिक्षण संस्थांचा श्वास गुदमरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Updated: Apr 4, 2017, 04:23 PM IST
'गरज असल्यास खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणा पण...' title=

पुणे : खाजगी शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. संसदेत देखील हा विषय आला होता. गरज असल्यास जरुर असे नियंत्रण आणावे. मात्र, त्यामुळे या शिक्षण संस्थांचा श्वास गुदमरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठाच्या वतीने पवार यांना मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक वाढ झालेली नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. मेक इन इंडिया बरोबर थिंक इन इंडिया मोहीम सुरू करायला हवी. त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.