पुण्यात दुसरीतील मुलावर ५ जणांनी केला अनैसर्गिक अत्याचार, चिमुरडा आयसीयूत

पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. अवघ्या दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या चिमुरड्यावर ५ नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेत तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Updated: Jul 17, 2015, 04:19 PM IST
पुण्यात दुसरीतील मुलावर ५ जणांनी केला अनैसर्गिक अत्याचार, चिमुरडा आयसीयूत title=

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. अवघ्या दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या चिमुरड्यावर ५ नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेत तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पुण्यातील वारजे इथल्या सिद्धेश्वर नगरमध्ये काल रात्री ही दुर्दैवी घटना घडली. पीडित मुलगा त्याच्या घराजवळ खेळत असताना त्या पाच आरोपींनी त्याला जवळच्या दगड खाणीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. या घटनेत त्या चिमुरड्याच्या शरीरावर आणि शरीरांतर्गतही अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. 

या पाचही नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यातील तिघेजण अल्पवयीन आहेत. 
पाच आरोपींपैकी दोन जण नितीन भंडारे (वय २१ वर्ष) आणि रवी पवार (वय २३ वर्ष) हे सज्ञान असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.