धक्कादायक उलगडा: सातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून

नालासोपाऱ्यातील सातवीतील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झालाय. नितेश तिवारी या १२ वर्षीय मुलाची हत्या त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या दोन मुलांनी केल्याचं उघड झालंय.

Updated: Jul 17, 2015, 04:26 PM IST
धक्कादायक उलगडा: सातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून  title=

नालासोपारा : नालासोपाऱ्यातील सातवीतील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झालाय. नितेश तिवारी या १२ वर्षीय मुलाची हत्या त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या दोन मुलांनी केल्याचं उघड झालंय.

नालासोपाऱ्यातील  सेंट ल्युक्स इंग्लिश हायस्कूलमधून १२ जुलैला नितेशचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर तीन दिवसानंतर त्याचा मृतदेहच हाती सापडला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितेश तिवारीनं दहावीतील त्या दोन मुलांना मोबाईल चोरतांना पाहिलं होतं. त्यानं ते घरी सांगायची धमकी दिली होती. त्यामुळं घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी नितेशची हत्या केली. नितेशच्याच बरमुड्याच्या नाड्याने त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा मृतदेह आरोपी विद्यार्थ्यांनी फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणात दहावीतील दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलंय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.