पुणे : पुण्यात झालेल्या स्फोटासाठी वापरण्यात आलेली मो़डस ऑपरेंडी पाहता यात इंडियन मुजाहिद्दीनच्या नवीन स्लीपर सेलचा हाथ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचं एटीएसच्या एका वरिष्ठ अधिका-यांनं सांगितलंय.
महाराष्ट्र एटीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, यासीन भटकळ आणि त्याचे इतर साथीदार जे एटीएसच्या अटकेत आहेत त्यांच्याशी या घटनेबाबत तपास सुरु असल्याचंही एटीसकडून सांगण्यात आलाय. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे.
कशामुळे संशय
- पुणे स्फोटात इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय
- स्फोटासाठी वापरलेली मोडेस ऑपरेंडी IMच्या नवीन स्लीपर सेलची
- पुणे स्फोटात बॉल बेअरिंग, छर्रे, खिळे आढळल्याने संशय बळावला
- पुणे पुन्हा इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर
कधी आणि कसा झाला स्फोट ?
- 2 वाजून २ मिनिटांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये स्फोट
- दगडूशेट मंदिरापासून १५ ते २० मीटर अंतरावर स्फोट
-MH -११ – ८७७१ नंबरच्या स्प्लेंडरमध्ये स्फोट, ३ जखमी
- पोलीस स्टेशन समोरच असल्यानं तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल
- BDDS कडून घटनास्थळाची तपासणी
- पोलीस आयुक्त सतीश माथुर घटनास्थळी दाखल
- पोलीस आणि BDDS पुरावे जमा करण्याचं काम सुरू
- घटनास्थळी खिळे, छर्रे सापडले
- स्फोटासाठी स्फोटकांचा वापर झाल्याचंही उघड
- स्फोट जाणीवपूर्वक घडवण्यात आल्याचं निष्पन्न
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.