पुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय

पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये झालेला स्फोट बॉम्बस्फोटच असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केलाय. त्यामुळं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुण्याला लक्ष्य केल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.

Updated: Jul 11, 2014, 04:27 PM IST
पुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय title=

पुणे: पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये झालेला स्फोट बॉम्बस्फोटच असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केलाय. त्यामुळं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुण्याला लक्ष्य केल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.

या स्फोटात एका पोलीस हवालदारासह तीन जण जखमी झाले आहेत. तसंच काही दुचाकींचही नुकसान झालंय. घटनास्थळी बॉल-बेअरिंग, छर्रे आणि खिळे आढळून आले आहेत. बॉम्बस्फोटाबाबत संशय बळावलाय. त्यामुळं पोलीस त्या दिशेनंच तपास करत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलीय. 

पुण्याच्या पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ज्या बाईकजवळ हा स्फोट झाला ती 
साताऱ्याची असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तर ही बाईक चोरीची असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय. दरम्यान मुंबई एटीएसची टीमही पुण्यात दाखल झाली आहे. तसंच या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 कधी आणि कसा झाला स्फोट ?

- 2 वाजून २ मिनिटांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये स्फोट 
- दगडूशेट मंदिरापासून  १५ ते २० मीटर अंतरावर स्फोट 
-MH -११ – ८७७१ नंबरच्या स्प्लेंडरमध्ये स्फोट, ३ जखमी 
- पोलीस स्टेशन समोरच असल्यानं तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल 
- BDDS कडून घटनास्थळाची तपासणी 
- पोलीस आयुक्त सतीश माथुर घटनास्थळी दाखल 
- पोलीस आणि BDDS पुरावे जमा करण्याचं काम सुरू
- घटनास्थळी खिळे, छर्रे सापडले
- स्फोटासाठी स्फोटकांचा वापर झाल्याचंही उघड 
- स्फोट जाणीवपूर्वक घडवण्यात आल्याचं निष्पन्न 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.