बापट साहेब परत या... कचरा कोंडीवर पोस्टर बाजी...

 पुण्यात कचरा प्रश्नावरून पेटलेलं राजकारण अजूनही शमलेलं नाहीए. कचरा कोंडीवर तात्परता का होईना तोडगा निघालेला असताना विरोधकांकडून पालकमंत्र्यावर खोचक स्वरुपाची टीका सुरुच आहे. 

Updated: May 10, 2017, 09:22 PM IST
 बापट साहेब परत या... कचरा कोंडीवर पोस्टर बाजी... title=

पुणे :  पुण्यात कचरा प्रश्नावरून पेटलेलं राजकारण अजूनही शमलेलं नाहीए. कचरा कोंडीवर तात्परता का होईना तोडगा निघालेला असताना विरोधकांकडून पालकमंत्र्यावर खोचक स्वरुपाची टीका सुरुच आहे. 

पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यावरून त्यांच्या विरोधात शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 

पुणे महापालिका तसेच शनिवारवाडा परिसरात ही होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत.