लोकलमध्ये बसून बिनदिक्कत दारु पिणा-याला अखेर अटक

मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बसून बिनदिक्कत दारु पिणा-याला अखेर अटक करण्यात आली आहे. एक तरुण गाडीच्या दरवाज्यात बसून खुलेआम दारु पित असल्याची दृश्यं कॅमेरात कैद झाली होती. भर गर्दीच्या वेळी दरवाजात बसून दारु पिणा-या या तरुणानं स्वतःचं नाव मोहित शेलार असं सांगितलं होतं.

Updated: Aug 11, 2016, 05:12 PM IST
लोकलमध्ये बसून बिनदिक्कत दारु पिणा-याला अखेर अटक title=

कल्याण : मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बसून बिनदिक्कत दारु पिणा-याला अखेर अटक करण्यात आली आहे. एक तरुण गाडीच्या दरवाज्यात बसून खुलेआम दारु पित असल्याची दृश्यं कॅमेरात कैद झाली होती. भर गर्दीच्या वेळी दरवाजात बसून दारु पिणा-या या तरुणानं स्वतःचं नाव मोहित शेलार असं सांगितलं होतं.

वांगणीला राहत असल्याचं सांगणा-या या तरुणानं, आपण कोणाला भीत नाही अशी वल्गनाही यावेळी केली होती. याबाबत काही तरुणांनी त्याला हटकलं असता, त्यानं उलट त्यांनाच दमदाटी केली होती. यावेळी एका प्रवाशानं समयसूचकता दाखवत, या तरुणाची व्हिडिओ क्लिप तयार केली. त्याआधारे त्याला अटक करण्यात आली आहे.