...जेव्हा महापालिकेच्या ऑफिसमध्ये दिसली डुक्करं

पुणे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात एकच पळापळ उडाली. कारण, भटकी कुत्री आणि डुकरं कार्यालयात नेऊन आंदोलन करण्यात आलं.

Updated: Aug 5, 2016, 10:55 AM IST
...जेव्हा महापालिकेच्या ऑफिसमध्ये दिसली डुक्करं title=

पुणे : पुणे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात एकच पळापळ उडाली. कारण, भटकी कुत्री आणि डुकरं कार्यालयात नेऊन आंदोलन करण्यात आलं.

शिवसेनेनं हे वेगळं आंदोलन केलं. हडपसर परीसरात डुकरं आणि भटक्या कुत्र्याचा सुळसुळाट झालाय. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. अनेकदा तक्रार करुनही महापालिका प्रशासन लक्ष देत नाही, असा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी चक्क भटकी कुत्री आणि डुकरं महापालिका अधिकाऱ्यांना भेट दिली. 

भटकी कुत्री आणि डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी एक महिन्याचा वेळ महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. अन्यथा शिवसेना स्वखर्चाने परीसरातील सर्व भटकी कुत्री आणि डुकरं गाडीत भरुन अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये सोडतील असा इशारा देण्यात आला आहे.