पंकजा मुंडेच्या हाती पोलिसांची काठी

लातूरमध्ये जलसंधारणाची पाहणी करताना सेल्फी काढल्यामुळं वादात सापडलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणखी एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. 

Updated: Apr 23, 2016, 08:39 AM IST
पंकजा मुंडेच्या हाती पोलिसांची काठी title=

सातारा : लातूरमध्ये जलसंधारणाची पाहणी करताना सेल्फी काढल्यामुळं वादात सापडलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणखी एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. 

सातारा जिल्ह्याच्या दौ-यावर असताना पंकजा मुंडेंनी आपलेच कार्यकर्ते आणि समर्थकांना दूर ठेवण्यासाठी थेट पोलिसांची काठीच हातात घेतली. 

शेकडो पोलीस संरक्षणासाठी तैनात असताना पंकजा मुंडेंना पोलिसांची काठी स्वत:च्या हातात घेण्याची का गरज पडली असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला.