जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० नोट चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर सकारात्मक प्रतिक्रिया येत असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. ते जालन्यात बोलत होते.
सरकारचा ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय गरीब, मध्यवर्गीय नागरिकांसाठी त्रासदायक आहे. देशात ९८ टक्के लोक गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत.
या निर्णयामुळे श्रीमंत लोकांच्या जीवनावर परिणाम होणार नाही. मात्र गरीब आणि मध्यमवर्गीयांचे व्यवहार रोखीने चालतात. त्यावर परिणाम होईल. बनावट नोटा रोखण्यासाठी बोर्डर सिमा सक्षम करा, असे ओवेसी म्हणाले.
तसेच मोदींच्या या निर्णयामुळे 15 लाख रूपये लोकांच्या खात्यावर जमा होणार का? 500 आणि 1000 च्या नोट बंद करतात तर पुन्हा 500 आणि 2000 नोटा कशासाठी काढ़ता? असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले. त्यासोबतच अॅट्रॉसिटीच्या मुद्दयावरुनही त्यांनी मोदींना लक्ष्य केले.