अंबरनाथ : दुर्गापाडा परिसरात विवाहित महिलेची तिच्या शेजारी राहणाऱ्यानं एकतर्फी प्रेमातून हत्या केली.
हत्येनंतर आरोपीनं स्वतःवरही वार करून स्वतःला जखमी करुन घेतलं. मनोरंजन महाकडू असं यातल्या आरोपीचं नाव आहे. मनोरंजनचं त्याच्याच शेजारी राहणा-या महिलेवर एकतर्फी प्रेम होतं.
तिच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून तो तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला महिलेनं विरोध केला म्हणून त्यानं तिच्यावर चाकूने वार केले.