'पोलिसांने रिव्हाल्वर रोखून एक लाखाची खंडणी मागितली'

जळगावमधील रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सादरे यांनी मस्तकावर रिव्हाल्वर ठेवून एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप वाळू व्यावसायिकाने केल्याने खळबळ उडालीय. पोलीस खात्याची बेअब्रू करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. 

Updated: May 6, 2015, 08:06 AM IST
'पोलिसांने रिव्हाल्वर रोखून एक लाखाची खंडणी मागितली' title=

जळगाव : जळगावमधील रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सादरे यांनी मस्तकावर रिव्हाल्वर ठेवून एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप वाळू व्यावसायिकाने केल्याने खळबळ उडालीय. पोलीस खात्याची बेअब्रू करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. 

गिरणा नदी पात्रात बालाजी इलेक्ट्रीकल्स या नावाने वाळूचा ठेका देण्यात आलाय, त्यामुळे वाळूचा उपसा करून हे डंपर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जातात त्याचे प्रभारी निरीक्षक अशोक सादरे यांनी वाळू व्यवसायातील भागीदार सागर चौधरी यांच्याकडून १ लाख हप्त्याची मागणी केली होती. ती पूर्ण न करू शकल्यामुळे सकाळी ३ डंपर जप्त केले. त्यानंतर सागर चौधरी आणि रवींद्र चौधरी यांना फोन करून सादरे यांनी घरी बोलावून घेत दोघांवर रिव्हॉल्वर रोखत खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रवींद्र चौधरी यांच्या खिशातून सादरे यांनी २० हजार रुपये काढून घेत तातडीने ८० हजारांची जमवाजमव करण्याचा दम भरल्याची तक्रार दोघांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

या प्रकरणामुळे मात्र पोलीस खात्याच्या अब्रूची लक्तरं वेशीला टांगली गेलीय. या प्रकरणाची चौकशी आता उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर पाडवी करीत आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सादरे दोषी आढळल्यास त्यांच्यावर खात्यांतर्गत किवा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं माहिती अधिका-यांनी दिली आहे

पोलिसांच्या या हप्तेखारी प्रकरणात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही लक्ष घातलंय, मात्र रात्रंदिवस गिरणा नदीपात्रातील वाळूची वाहतूक करून नदीचे लचके तोडणाऱ्या माफियांवर खडसे एमपीडीए कायदा लावण्यासाठी सांगणार का याचीच सर्वांना प्रतीक्षा लागून आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.