VIDEO : 'कोकणकन्ये'च्या टॉयलेटमध्ये अडकला महिलेचा पाय आणि...

कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये एक विचित्र अपघात घडला. त्या अपघातात एक वृद्ध रेल्वे डब्याच्या टॉयलेटमध्ये अडकून पडली होती. तब्बल दहा तासानंतर त्या महिलेची सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. मात्र, या वृद्ध महिलचा पाय अडकल्यानंतर तशाच अवस्थेत तिला पुढचे सात तास रत्नागिरीपर्यंत प्रवास करावा लागला. या प्रवासा दरम्यानच्या स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाची काय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Updated: Dec 11, 2015, 11:27 PM IST
VIDEO : 'कोकणकन्ये'च्या टॉयलेटमध्ये अडकला महिलेचा पाय आणि...  title=

प्रणव पोळेकर, रत्नागिरी : कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये एक विचित्र अपघात घडला. त्या अपघातात एक वृद्ध रेल्वे डब्याच्या टॉयलेटमध्ये अडकून पडली होती. तब्बल दहा तासानंतर त्या महिलेची सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. मात्र, या वृद्ध महिलचा पाय अडकल्यानंतर तशाच अवस्थेत तिला पुढचे सात तास रत्नागिरीपर्यंत प्रवास करावा लागला. या प्रवासा दरम्यानच्या स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाची काय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

काल रात्री कोकण कन्या एक्स्प्रेस मुंबईतून कोकणच्या दिशेने रवाना झाली. रेल्वेत प्रवास करणाऱ्या एक जेष्ठ महिला पनवेलच्या पुढे बोगीतील टोयलेटमध्ये गेल्या असता त्या तिथे पडल्या आणि त्यांचा पाय अगदी मांडी पर्यंत या टॉयलेटच्या होलमध्ये अडकला. रुबीना असं या ६८ वर्षीय महिलेचं नाव आहे. ही घटना रात्री एक वाजता घडली आणि या आजी अशाच पद्धतीने अडकलेल्या अवस्थेत प्रवास करत राहिल्या.

रुबीना आजींच्या बरोबर प्रवास करणाऱ्या पतीने याची खबर कोकण रेल्वे प्रशसनलन दिली पण या आजींना काढता येईल अशी कोणतीच यंत्रणा कोकण रेल्वेच्या मार्गावर उपलब्ध झाली नाही. अशा अडकलेल्या अवस्थेतातच या आजीनं रत्नागिरी स्थानकात आणण्यात आलं.

बोगीचा पत्रा काढावा लागला
या आजींचा टॉयलेटमध्ये अडकलेला पाय बाहेरूनही दिसत होता. यंत्रणा वैद्यकीय अधिकारी सारे तैनात करण्यात आले. मात्र, पाय इतक्या विचित्र पद्धतीने अडकला होता की बोगीचा पत्रा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. तब्बल साडे अकरा तासांनंतर शर्तीच्या प्रयत्नाने कोकण रेल्वेचे अभियंते कामगार आणि रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळीनी अतिक्षय कुशलतेने या आजींना कोणतीही दुखापत न पोहोचवता या आजींन बाहेर काढलं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. 
 
साडे अकरा तास लोंबकळत... 
अथक प्रयत्नानंतर कोकणकन्या एक्सप्रेसच्या डब्यातून  रुबीना  नावाच्या महिलेची सुटका करण्यात आली. ६८ वर्षीय रुबीनाची सुटका झाली आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. इथे उर्वरित ट्रेन पुढे पाठवून ही बोगी इथे थांबवून ठेवण्यात आली. मात्र तो पर्यंत साडे अकरा तास उलटून गेले होते. यानंतर या आजींना अधिक उपचारांकरीता रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

तब्बल साडे अकरा तास अडकल्याने त्यांना मानसिक धक्का बसला होता. मात्र, या संपूर्ण काळात आजीने दाखलेलं धौर्य आणि संयम निश्चितच वाखाणण्याजोगं होतं. आजीने दाखवलेला संयम आणि अभियंता आणि कामगारांनी दाखवलेली कुशलता यामुळेच केवळ या आजी बाहेर येवू शकल्या. मात्र पनवेलच्या पुढे अपघातग्रस्त झालेल्या या आजींना यातून बाहेर प़डण्यासाठी अडकलेल्या अवस्थेत पुढील सात तासांचा रत्नागिरीपर्यंतचा प्रवास करावा लागला. यामुळे कोकण रेल्वेच्या विविध स्थानकातील अपातकालीन यंत्रणेबाबत सवाल उपस्थित झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.