ओला-उबेरला आता सरकारी नियम लागू

संकेतस्थळ आधारित किंवा ऍप बेस्ड टॅक्सींसाठी महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017 लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

Updated: Mar 4, 2017, 08:15 PM IST
ओला-उबेरला आता सरकारी नियम लागू title=

मुंबई : संकेतस्थळ आधारित किंवा ऍप बेस्ड टॅक्सींसाठी महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017 लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या नव्या नियमामुळं ओला, उबेर या अॅप आधारीत खासगी टॅक्सी सेवा सरकारी नियमांच्या कक्षेत येणार आहेत. 

या टॅक्सींचं कमाल आणि किमान भाडं किती असावं हे सरकार निश्चित करणार आहे. याशिवाय टॅक्सीचा रंग काय असावा हे सुद्धा सरकार ठरवणार आहे. तसंच या टॅक्सींमध्ये जीपीएस यंत्रणा बंधनकारक करण्यात आलीय. काळया-पिवळया टॅक्सी चालकांच्या मुजोरीमुळे नागरीकांची अॅप बेस टॅक्सी सेवांना पहिली पसंती असते. मात्र आता ओला, उबेर टॅक्सी सेवेला सरकारी नियम लागू होणार आहेत.