ब्रुमsss... ब्रुमsss... बुलेटचा 'स्पेशल सायलन्सर' झाला शांत!

बाईक प्रेमींची लाडकी बुलेट... त्यातही बुलेटचा दणकेबाज आवाज म्हणजे वेगळीच शान... पण, आता मोठा किंवा वेगळ्या आवाजाचा सायलन्सर बसवून पुण्यात बुलेटवर सवारी करणार असाल तर, सावधान… कारण असे सायलन्सर असलेल्या बुलेट गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  

Updated: Jul 23, 2015, 11:00 PM IST
ब्रुमsss... ब्रुमsss... बुलेटचा 'स्पेशल सायलन्सर' झाला शांत! title=

पुणे : बाईक प्रेमींची लाडकी बुलेट... त्यातही बुलेटचा दणकेबाज आवाज म्हणजे वेगळीच शान... पण, आता मोठा किंवा वेगळ्या आवाजाचा सायलन्सर बसवून पुण्यात बुलेटवर सवारी करणार असाल तर, सावधान… कारण असे सायलन्सर असलेल्या बुलेट गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  
 
यापुढे पुण्यात बुलेटनं असा वाढीव आवाज काढला तर वाहतूक पोलीसांच्या कारवाईचा फटका बसणार आहे. हा आवाज कायद्यात काही बसत नाही. त्यामुळं वाहतूक पोलिसांनी मोठा किंवा वेगळा आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या विरोधात मोहीमच हाती घेतली आहे. मागील आठवडा भरात साडे तीनशे बुलेट चाकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. 

बाईक प्रेमींची बुलेटला विशेष पसंती असते… आणि बुलेट प्रेमींची वेगवेगळ्या प्रकारच्या सायलन्सरला पसंती असते. ओरिजनल सायलन्सर काढून, इंदोरी, पंजाब, गोल्डस्टार असे अनेक प्रकारचे सायलन्सर बुलेटला बसवले जातात. त्यातही इंदोरी सायलन्सरला जास्त मागणी आहे. असे सायलेन्सर लावणा-या गॅरेजेसवरही कारवाई होणार आहे. पुण्यातले सर्व बुलेट राजांना पोलिसांनी इशारा दिलाय... आवाज काढाल तर कारवाई करू...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.