सावत्र आईनंच 11 वर्षांच्या दक्षचा दिला 'नरबळी'?

ठाणे जिल्ह्यातल्या कसाऱ्यामधून बेपत्ता झालेल्या अकरा वर्षांच्या दक्ष या मुलाचा मृतदेह सापडलाय. 

Updated: Jul 23, 2015, 10:45 PM IST
सावत्र आईनंच 11 वर्षांच्या दक्षचा दिला 'नरबळी'? title=

ठाणे : ठाणे जिल्ह्यातल्या कसाऱ्यामधून बेपत्ता झालेल्या अकरा वर्षांच्या दक्ष या मुलाचा मृतदेह सापडलाय. 

टिटवाळ्याजवळ खडवली नदीपात्रात दक्षचा मृतदेह आढळलाय. दक्षची सावत्र आई, सावत्र मावशी आणि सावत्र मामीवर या हत्येचा संशय असून पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेतलंय.

धक्कादायक बाब म्हणजे या तिघींनी नरबळीच्या प्रकारात ही हत्या केल्याचा संशय दक्षच्या सख्या मामानं व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढलंय. 

या प्रकरणी सावत्र आई लता खानझोडे, सावत्र मामी वर्षा उर्फ अस्मा, आणि सावत्र मावशी मालिनी यांच्या चौकशीतूनच पुढला प्रकार उघड होऊ शकेल. या तिघींना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

कसाऱ्यातल्या कोळीवाडा परिसरातून दक्ष २ जुलैला बेपत्ता झाला होता. दक्षचा मामा देविदास पाडव यांनी लता खानझोडे ही दक्षला विद्रूप करणं, चटके देणं, रात्रीच्या वेळी आंघोळ घालणं, आरती पूजा करणं असले प्रकार करत असल्याची तक्रार केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.