राज्यात पावसाची विश्रांती! शेतकरी चिंतेत

राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Updated: Jun 29, 2015, 10:26 PM IST
राज्यात पावसाची विश्रांती! शेतकरी चिंतेत title=

पुणे : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

मागील चार दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. अनुकूल स्थिती नसल्याने पावसाने संपूर्ण राज्याकडेच पाठ फिरविल्याचे चित्र आहे. 

समुद्र सपाटीवर दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता नाही, असे विभागातर्फे सांगण्यात आले. पावसासाठी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे आवश्यक आहे. 

मात्र, सध्या दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी कमी झाली आहे. 

मागील २४ तासांत कोकणात सावंतवाडी येथे तर विदर्भात आरमोरी आणि देसाईगंज येथे तुरळक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या २४ तासांत कुठेच पाऊस झालेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.