कुणाच्या मागणीवरून सनातनवर बंदी नाही - खडसे

कुणाच्या मागण्यावरून  सांगण्यावरून सनातनवर बंदी घालणार नसल्याचे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. 

Updated: Oct 1, 2015, 08:17 PM IST
कुणाच्या मागणीवरून सनातनवर बंदी नाही - खडसे  title=

नागपूर : कुणाच्या मागण्यावरून  सांगण्यावरून सनातनवर बंदी घालणार नसल्याचे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. 

राज्य सरकारकडे आवश्यक ते पुरावे असतील तरच बंदी घातली जाइल असे ते आज नागपूरला म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सिकर यांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. 

एका कार्यक्रमानिमित्त अमरावती गेले खडसे परतीच्या प्रवासावर असताना नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.  न्यायालयासमोर सक्षम असे पुरावे असल्याशिवाय बंदी घालता येणार नाही, असे देखील ते म्हणाले.

यासंबंधी काँग्रेसने केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता काँग्रेसने आपल्या काळात बंदी का नाही घातली, असा प्रती प्रश्न त्यांनी केला. काँग्रेसने या स्माबंधी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता, असे सांगत आपण त्या पक्षाच्या भूमिकेकडे गांभीर्याने घेत नसल्याचे ते म्हणाले.

एकीकडे LBT रद्द करणे आणि दुसरीकडे नवीन कर बसवणे हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याच्या आरोपांबद्दल विचारले असता, शेतकऱ्यांच्या मदती करता आपण हे पाउल उचलल्याचा दावा त्यांनी केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.