नागपूर : दिल्ली केद्रींय मंत्रीपदावर रुजू झाल्यापासून कॉंग्रेस माझ्यावर सातत्याने खोटे आरोप करत आहे, अशी माहिती खुद्द नितिन गडकरी यांनी एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत दिली आहे.
कॉंग्रेसने संपूर्ण ताकतीनिशी माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतआहे. मात्र मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे, कधीही भ्रष्टाचार केला नसल्याचेही गडकरी यांनी सांगितले. पूर्ती समूहाच्या मुद्द्यावरुन कॉग्रेस आक्रमक झाली आहे, यावर उत्तर देतांना गडकरी बोलत होते.
मी जनसामान्यांच्या विकासाठी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लढत आहे, तरीही माझ्यावर आरोप होतात. मी जर जनतेचा एक रूपया जरी बूडवला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.