अजित पवारांच्या जवळचे रमेश आडसकर भाजपमध्ये

राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसंच राष्ट्रवादीचे नेते रमेश आडसकर यांनी औरंगाबाद इथं पंकजा पालवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आडसकरांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Updated: Sep 2, 2014, 11:04 PM IST
अजित पवारांच्या जवळचे रमेश आडसकर भाजपमध्ये title=

औरंगाबाद: राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसंच राष्ट्रवादीचे नेते रमेश आडसकर यांनी औरंगाबाद इथं पंकजा पालवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आडसकरांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

पूर्वी भाजपमध्ये असलेल्या आडसकरांनी 7 वर्षांपूर्वी भाजपच्या काही सदस्यांना सोबत घेत आ. सुरेश धस यांच्यासह गोपीनाथ मुंडेंना हादरा देत राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत विश्वासू असलेले रमेश आडसकर 2009च्या लोकसभा निवडणुकीपासून नाराज होते. त्यांना विधानपरिषद न देता अमर सिंह पंडित यांची वर्णी लागल्यानं ते अधिकच नाराज झाले होते. 

राखीव असणारा केज मतदार संघ, माजलगाव, आणि रेणापूर या तीन मतदार संघात त्यांचं वर्चस्व आहे. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. आडसकर यांच्या भाजप प्रवेशामुळं बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता अडचणीत येवू शकते. तसंच केज आणि माजलगाव मतदार संघात भाजपला बळ मिळणार हे निश्चित. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.