100 दिवसांचं चित्र आशादायक : मा.गो.वैद्य

100 दिवसांत देशात आशादायक चित्र निर्माण झाल्याची प्रतिक्रिया संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो.वैद्य यांनी दिलीय. तर भाजपचे नव्हे युपीएच्याच पराभवाचे 100 दिवस पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. 

Updated: Sep 2, 2014, 07:37 PM IST
100 दिवसांचं चित्र आशादायक : मा.गो.वैद्य title=

नागपूर : 100 दिवसांत देशात आशादायक चित्र निर्माण झाल्याची प्रतिक्रिया संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो.वैद्य यांनी दिलीय. तर भाजपचे नव्हे युपीएच्याच पराभवाचे 100 दिवस पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीचे 100 दिवस पूर्ण करताहेत. कारकिर्दीतले हे सुरवातीचे १०० दिवस वादळी ठरताहेत. बहुमतानं सत्तेत आलेलं नरेंद्र मोदी नावाचं एक स्वयंभू सत्ताकेंद्र दिल्लीत तळपू लागल्याची जाणीव सगळ्यांनाच होतेय. 

नरेंद्र मोदी सरकारनं असे कितीतरी महत्वाचे निर्णय घेत आपल्या कारभाराला जोमदारपणे सुरवात केलीय. पण मोदी सरकारला पहिल्या शंभर दिवसांमध्ये वादाचाही सामना करावा लागलाय.

भाजपनं निवडणुकीच्या वेळी अच्छे दिनचं केवळ स्वप्नच दाखवलं. प्रत्यक्षात महागाई वाढत असल्याची टीका काँग्रेसनं केलीय. तर जीडीपीमध्ये झालेली वाढ ही यूपीएच्या प्रयत्नांचाच भाग असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.