नाशिकमध्ये हजारो रूपयांची दारू जप्त

नाशिकमधल्या घारपुरे घाट परिसरात हरीश प्रभाकर गांगुर्डे याच्या घरातून पोलिसांनी हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 23, 2017, 08:09 AM IST
 नाशिकमध्ये हजारो रूपयांची दारू जप्त title=

नाशिक : नाशिकमधल्या घारपुरे घाट परिसरात हरीश प्रभाकर गांगुर्डे याच्या घरातून पोलिसांनी हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केला.

 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या परिसरात दारुचं वाटप केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 

दरम्यान मोठ्या प्रमाणात दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्रत्यक्षात थोडाच साठा हाती लागल्यानं उर्वरीत दारूची विल्हेवाट कोणी आणि कशी लावली याचा तपास पोलीस करताहेत.