राष्ट्रवादीच्या आमदारांची सटकली... शेतकऱ्यांसमोर लाखोळी

राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भारणे यांची सटकली आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांना शिव्याची लाखोळी वाहली. याचा व्हीडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यानंतर आमदारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2017, 10:56 PM IST
राष्ट्रवादीच्या आमदारांची सटकली... शेतकऱ्यांसमोर लाखोळी title=

इंदापूर : राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भारणे यांची सटकली आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांना शिव्याची लाखोळी वाहली. याचा व्हीडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यानंतर आमदारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

तरणवाडी येथे शेतकरी पाण्यासाठी आंदोलन करत होते. यावेळी आमदार दत्ता भारणे यांनी शेतकऱ्यांसमोरप शिव्या दिल्यात. यावेळी अधिकाऱ्यांनाही अर्वाच्य शब्द वापलेत. त्यामुळे या येथील वातावरण अधिकच तापले आहे. दरम्यान, याबाबत आमदार भारणे यांनी स्पष्टीकरण दिलेय. 

माझ्याविरोधात टीका करण्यात आली. वैयक्तिक टीका करताना माझ्यावर एकेरी भाषेत खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे माझ्याकडून अनावधानाने उल्लेख झाला असेल. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणालेत.