इंदापुरात जन आक्रोश मोर्चा, सरकारविरोधी घोषणा

कर्जमाफी, वीजबिल माफीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापुरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकरी, महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2017, 11:07 PM IST
इंदापुरात जन आक्रोश मोर्चा,  सरकारविरोधी घोषणा title=

इंदापूर : कर्जमाफी, वीजबिल माफीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापुरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकरी, महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

कर्जमाफीसोबतच भाटघर आणि खडकवासला धरणाचं पाणी सिंचनासाठी तत्काळ मिळावं, नीरा नदीमध्ये पाणी सोडावं, पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टँकर मंजूर करावेत, रोजगार हमीची कामं सुरू करावीत अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाही देण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला.