नागपूर: नागपूरचे नवे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव हे पदभार सांभाळत असतानाच, नागपुरातील गुन्हेगारांनी त्यांना जोरदार सलामी दिली. नागपुरातल्या चोरांची एवढी हिंमत वाढलीय की आता भरदिवसा घरात घुसून ते लुटालूट करू लागलेत.
गजबजलेल्या धंतोली परिसरातील ज्योत्स्ना साठे या वृद्ध महिलेच्या घरात भरदिवसा दोन चोर घुसले. 68 वर्षांच्या ज्योत्स्ना आजी आणि त्यांची केअर टेकर अर्चना तोडसाम यांना चाकूचा धाक दाखवत, त्यांनी आजींच्या गळ्यातील 22 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचली.
त्यानंतर या दोन्ही चोरांनी तिथून पोबारा केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.