रेशनच्या काळ्या बाजाराला वरदहस्त कुणाचा, नागपुरात 600 पोती धान्य पकडलं

नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार समोर आलाय. जवळपास सहाशे पोती धान्य पकडण्यात आलंय. याप्रकरणी कारवाई करण्याचं सोडून पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप होतोय. 

Updated: Aug 24, 2015, 11:32 PM IST
रेशनच्या काळ्या बाजाराला वरदहस्त कुणाचा, नागपुरात 600 पोती धान्य पकडलं title=

अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर: नागपुरात रेशन धान्याचा काळाबाजार समोर आलाय. जवळपास सहाशे पोती धान्य पकडण्यात आलंय. याप्रकरणी कारवाई करण्याचं सोडून पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप होतोय. 

जप्त केलेला हा ट्रक स्वस्त धान्याचा आहे.. खरं तर रेशन दुकानावर हा ट्रक जाणं अपेक्षित होतं. पण ट्रक खाजगी गोडाऊनकडे जात असताना त्यावर जिल्हा पुरवठा विभागानं कारवाई केली. बुट्टीबोरी आणि वाडी भागात धाड टाकून तब्बल 600 पोते धान्य जप्त करण्यात आलंय.  

रेशनच्या काळ्या बाजारात एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी गुंतल्याचाही आरोप होतोय. अधिकारी यासंदर्भात उघडपणे बोलण्यास नकार देत असले तरी स्थानिक मात्र संबंधितांची नावं उघड करतायत.

रेशन दुकानदार नंदू गौरकरवर स्वस्त धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजकीय वरदहस्त असल्यामुळे अटक अजूनही झालेली नाही. पोलिसांशी यासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जिल्हा पुरवठा विभागानं कारवाई केल्याचं सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र या सगळ्या प्रकारात लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.