वसईतील ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही

पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचं थैमान घालणाऱ्या इबोला रोगाचा आढळलेल्या संशयीत रुग्णाला या रोगाची लागण झाली नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. 

Updated: Aug 11, 2014, 06:20 PM IST
वसईतील ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही  title=

मुंबई : पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचं थैमान घालणाऱ्या इबोला रोगाचा आढळलेल्या संशयीत रुग्णाला या रोगाची लागण झाली नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. 
रुग्णाची तपासणी केल्यानंतर लक्षात आले की, त्याने मित्रांसोबत हॉटेलमध्ये काही खाल्ले होते त्यामुळे त्याला डायरियाचा त्रास झाला. पण त्याची प्राथमिक चाचणी केली तर त्याच्यावर असे कोणताही व्हायरस त्याच्या नसल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. 

रुग्ण हा स्वतःहून केंद्रीय आरोग्य विभागाच्या संपर्कात आला होता. ३१ वर्षाचा हा व्यक्ती मूळचा भारतीय आहे. पण तो कामानिमित्त नायजेरियाला गेला होता. नायजेरियात इबोला या रोगाना थैमान घाल्यावर तो घाबरून नायजेरीयावरून पुन्हा भारतात आला. त्याला घरी आल्यावर डायरिया आणि अंगदुखीचा त्रास सुरू झाला. त्याला इबोलाची लक्षणे माहीत होतीच. त्याने तात्काळ ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिल्लीत कळवली. तेथून हालचालींना वेग आला. 

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने या तरुणास तात्काळ आज दुपारी वसई-विरार शहर महापालिकेच्या सर डी.एम. पेटीट रुग्णालयात भरती केले. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर स्वतंत्र विशेष कक्षात त्याला ठेवण्यात आले. तो संपूर्ण एरिया रुग्णालयाने सील केला आहे. 

विशेष खबरदारी  

इबोला वायरसचा धोका लक्षात घेवून मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं विशेष खबरदारी जात आहे. इबोलाचा संशयित रूग्ण आढळल्यास जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठवले जाणार आहे. तर तिथं ठेवूनही रूग्ण बरा न झाल्यास त्याला कस्तुरबा रूग्णालयात हलवलं जाणाराय.

तसंच जे जे रूग्णालयातही काही खाटा यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित आफ्रिकन देशातून परतणा-या भारतीय नागरिकांची विमानतळावरच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. 

चेन्नईच्या ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही

 संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित भारतातही सापडल्याची जोरदार चर्चा होती. मात्र चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेल्या संशयिताला इबोलाची लागण झाली नसल्याचं समोर आलंय.

हा संशयित भारतीय असून न्यू गिनी देशातून आला असून, या नागरिकाला इबोलाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या रूग्णाची तपासणी केल्यानंतर तो पूर्णपणे स्वस्थ असल्याचं सांगण्यात आलंय.
दरम्यान इबोलाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे विमानतळावर आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष वॉच ठेवण्यात येतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.