नवोदय विद्यालय विनयभंग : प्राचार्यांची उचलबांगडी

जिल्ह्यातील नवोदय विद्यालय विनयभंग प्रकरणी प्राचार्य रामवतार सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Updated: Apr 9, 2015, 09:13 AM IST
नवोदय विद्यालय विनयभंग  : प्राचार्यांची उचलबांगडी title=

अकोला : जिल्ह्यातील नवोदय विद्यालय विनयभंग प्रकरणी प्राचार्य रामवतार सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

रामवतार सिंग यांची दमण येथे बदली करण्यात आली आहे. या विनयभंग प्रकरणात विद्यार्थिनींच्या तक्रारीवरुन ३ शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातल्या बाभूळगाव इथल्या नवोदय विद्यालयातल्या ५५ मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी 'झी मीडिया'नं आवाज उठवल्यानंतर राजन गजभिये आणि शैलेश रामटेके या दोघा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

तसंच त्यांच्यावर लैंगिक छळाचा कायदा 'पॉस्को' अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटलांनी नवोदय विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर करण्याचे आदेश दिलेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.