"आमची पंधरा वर्षापासूनची सत्ता गेली ते बरंच झालं"

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रांजलपणे सत्ता गेली ते बरं झालं, अशी कबुली दिली आहे. राष्ट्रवादी मागील पंधरा वर्षापासून सलग सत्तेत असल्याने, नेत्यांचा जनतेशी संपर्क कमी झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. आता उलट राष्ट्रवादीचे नेते विरोधात राहून जोरदार भाषण करत आहेत आणि त्यामुळे लोकांच प्रेम वाढतं आहे, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणल्या.

Updated: Apr 8, 2015, 09:32 PM IST
"आमची पंधरा वर्षापासूनची सत्ता गेली ते बरंच झालं" title=

सांगली : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रांजलपणे सत्ता गेली ते बरं झालं, अशी कबुली दिली आहे. राष्ट्रवादी मागील पंधरा वर्षापासून सलग सत्तेत असल्याने, नेत्यांचा जनतेशी संपर्क कमी झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. आता उलट राष्ट्रवादीचे नेते विरोधात राहून जोरदार भाषण करत आहेत आणि त्यामुळे लोकांच प्रेम वाढतं आहे, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणल्या.

मी लहान असल्यापासून मंत्रीच पाहत आले आहे, तेव्हा त्या मंडळीला विरोधात बोलतांना पाहिलं आणि वाटलं की राष्ट्रवादीला विरोधी पक्ष मानवलाय.

ईडा पिडा टळो आपण म्हणतो, पण ती पिडा टळली आणि सत्ता गेली ते बरं झालं, अशी प्रांजळ कबुली राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हातजोडून दिली आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीत सुमनताई पाटील यांच्या प्रचारातील जाहीर सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.