मंत्री महादेव जानकर यांचे धक्कादायक विधान, धनगर समाजामुळे मंत्री नाही!

धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचे धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2017, 07:27 PM IST
मंत्री महादेव जानकर यांचे धक्कादायक विधान, धनगर समाजामुळे मंत्री नाही! title=

पंढरपूर, सोलापूर : धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचे धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीत धनगर समाजाच्या मतांपेक्षा मराठा आणि ब्राम्हण समाजाने आपल्याला भरघोस मतदान केल्याचं जानकर म्हणालेत. 

राष्ट्रीय समाज पक्ष हा धनगर समाजाचा पक्ष नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या विधानामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रीपदावर विराजमान झालेल्या महादेव जानकरांना टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.