मराठी चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान 'प्रभात टॉकीज'वर संक्रांत

मराठी चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली वाटचालीचा साक्षीदार असणारं पुण्यातलं प्रभात थिएटर हे विकण्यात येणार असल्याच्या बातमीने मराठी कलाकार आणि चित्रपटरसिकांना धक्का बसलाय. तब्बल ८० वर्षांचा इतिहास असणा-या या थिएटरला मराठी चित्रपटसृष्टीत एक मानाचं स्थान आहे. या टॉकीजवर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत.

Updated: Dec 4, 2014, 09:19 AM IST
मराठी चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान 'प्रभात टॉकीज'वर संक्रांत title=

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली वाटचालीचा साक्षीदार असणारं पुण्यातलं प्रभात थिएटर हे विकण्यात येणार असल्याच्या बातमीने मराठी कलाकार आणि चित्रपटरसिकांना धक्का बसलाय. तब्बल ८० वर्षांचा इतिहास असणा-या या थिएटरला मराठी चित्रपटसृष्टीत एक मानाचं स्थान आहे. या टॉकीजवर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत.

गेल्या ८० वर्षांपासून मराठी चित्रपचसृष्टीच्या वाटचालीची साक्ष देणारं आणि पुण्याच्या अगदी मध्यवस्तीमध्ये असलेलं प्रभात थिएटर. केवळ मराठी सिनेमांच्या सेवेत वाहून घेतलेलं पुण्यातलं एकमेव थिएटर. १९३४ साली सरदार किबे यांनी किबे लक्ष्मी थिएटर या नावाने ही चित्रपटगृहाची वास्तू उभी केली. त्यानंतर काही वर्षात प्रभात कंपनीच्या वितरकांनी हे थिएटर चालवायला घेतलं. तेव्हापासून अगदी बालगंधर्वांच्या नाटकांपासून ते व्ही शांताराम यांच्या सिनेमांपर्यंत हे थिएटर पुणेकरांचं मनोरंजन करतंय.

लक्ष्मीकांत बेर्डेंपासून ते भरत जाधवच्या चित्रपटांपर्यंतचा मराठी चित्रपटांचा काळ या थिएटरनं अनुभवला. आता मात्र हे थिएटर जमीनदोस्त करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पुणेकर रसिकांनी नाराजी व्यक्त केलीय.

मराठी सिनेमाचा हा वारसा जपण्यासाठी शक्य तितके सगळे प्रयत्न करणार असल्याचं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं सांगितलंय. तर दुसरीकडे प्रभातचे सध्याचे संचालक विवेक दामले यांनीही थिएटर सुरु रहावं, यासाठी ती जागा विकत घेण्याचीही तयारी दाखवलीय.

पुण्यातल्या बाजीराव रोडवर अगदी मध्यवस्तीत तब्बल १४ हजार स्क्वेअर फूट जागेत असणा-या या थिएटरवर मालकी मिळविण्यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांची नजर असल्याचीही चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.