मराठा क्रांती मूक मोर्चा उद्या कोल्हापुरात

 कोल्हापुरात उद्या मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणारेय.  या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतोय. 

Updated: Oct 14, 2016, 10:07 PM IST
मराठा क्रांती मूक मोर्चा उद्या कोल्हापुरात title=

कोल्हापूर :  कोल्हापुरात उद्या मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणारेय.  या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतोय. 

शहरातील मुख्य सहा मार्गावरुन हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौकात काढण्यात येणारेय. 

यापूर्वी महाराष्ट्राच्या विविध शहरात काढण्यात आलेल्या मराठा मूक मोर्चा प्रचंड संख्येने मराठा समाजाने पाठिंबा दिला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या मोर्चांचे आयोजन करण्यात  आले होते. आता यातील पुढील मोर्चा कोल्हापुरात होणार आहे. 

त्यामुळे मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सामील होण्याची आशा मराठा क्रांती मोर्चा तर्फे करण्यात येत आहे.