ठाण्यात चक्क रस्त्यावर सिंह फिरतोय...

ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक सिंह फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियातून सर्वत्र फिरतो आहे. व्हॉटस अपवर कुणा अज्ञात व्यक्तीनं ही क्लिप अपलोड केलीय.

Updated: Dec 11, 2014, 11:30 PM IST
ठाण्यात चक्क रस्त्यावर सिंह फिरतोय... title=

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक सिंह फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियातून सर्वत्र फिरतो आहे. व्हॉटस अपवर कुणा अज्ञात व्यक्तीनं ही क्लिप अपलोड केलीय.

क्लिपमध्ये सिंहाची मादी दिसत असून, तिचं चित्रिकरण करणा-या व्यक्ती गुजराती भाषेत बोलत आहेत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांमध्ये विशेषतः घोडबंदर परिसरात राहणा-या नागरिकांमध्ये घबराट पसरलीय.

वन विभागाने या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली असता, हा फेक व्हिडीओ असल्याचं मुख्य वन संरक्षक के. पी. सिंग यांनी सांगितलं. हा व्हिडीओ गुजरातमधील गीरच्या जंगलाच्या आसपासचा असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. याबाबतची चौकशी करण्यासाठी त्यांनी ठाणे सायबर सेलकडे लेखी तक्रार दिलीय.

सिंहाचा हा व्हिडीओ कोणी पसरवला, याचा शोध आता ठाणे सायबर सेलला करावा लागणार आहे. त्याशिवाय रस्त्यावर सिंह पाणी पित असल्याची आणखी एक व्हिडिओ क्लिप प्रसारित होतेय. परंतु ती क्लिपही महराष्ट्रातील नाही, असं वन विभागाने स्पष्ट केलंय. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहनही वन विभागानं केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.